ताज्या घडामोडी

कर्वे गुरुजी यांचे निधन..

तळेगाव दाभाडे: येथील अध्यात्मिक गुरु श्रीकृष्ण ऊर्फ राजाभाऊ गोपीनाथ कर्वे गुरुजी यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

निधन वार्ता.

कर्वे गुरुजी यांचे निधन.आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर, २४ फेब्रुवारी.

तळेगाव दाभाडे: येथील अध्यात्मिक गुरु श्रीकृष्ण
ऊर्फ राजाभाऊ गोपीनाथ कर्वे गुरुजी यांचे गुरुवारी पहाटे
वृद्धापकाळाने निधन झाले.
ते ९४ वर्षांचे होते.

त्यांच्या मागे मिलिंद, संदीप, संजय अशी तीन ३मुले, ३मुली, पुतणे,सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी शेकडोच्या संख्येने सेवेकरी वर्ग उपस्थित होता .
यावेळी डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. सुचित्रा नागरे, हभप. चैतन्य महाराज कबीर , माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, संजय हुंडरे, संजय शेवाळे,माजी नगरसेवक अरुण माने,
ॲड. प्रभाकर शेवाळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती जे.आर. भालेराव, लोहगड विसापूर विकास मंचाचे संस्थापक
सचिन टेकवडे, पंडित प्रकाश महाजन,बाळासाहेब कर्वे
यांच्यासह सेवेकरी वर्ग उपस्थित होता. यावेळी
कर्वे गुरुजी यांनी दिलेल्या ओम श्री विश्वदर्शन देवताय नमः
या मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला.
डॉ. विश्वनाथ कराड ,हभप चैतन्य महाराज कबीर, अरुण माने यांनी श्रद्धांजली समर्पित केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!