ताज्या घडामोडी

भावी शिक्षकांनी शब्दसंग्रह वाढवावा ः प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम.

भावी शिक्षिकांसमोर आज त्यांनी प्रचंड शब्दसंग्रहाच्या जोरावर हृदयाला साद घालणार्‍या कविता सादर केल्या.

भावी शिक्षकांनी शब्दसंग्रह वाढवावा ः प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम.

भावी शिक्षिकांसमोर आज त्यांनी प्रचंड शब्दसंग्रहाच्या जोरावर हृदयाला साद घालणार्‍या कविता सादर केल्या Future teachers should increase their vocabulary: Principal Dr. Poornima Kadam.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, २८ फेब्रुवारी.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बी.एड.चे शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थीनी भावी काळात आपण शिक्षक, शिक्षीका होणार आहेत उद्याचा भारत घडविण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे असून त्यासाठी विविध उपक्रमे राबविण्यात यावेत, अशा सूचना संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा यांनी केल्या त्यानुसार मराठी राज्यभाषा दिनानिमित्त कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुजन, पुष्पहार अर्पण करून कवियत्री संगीता झुंजिरके यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, मराठी विभाग प्रमुख प्रा. गीता कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पल्लवी चव्हाण, डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रा. मनिषा पाटील, डॉ. संतोष उमाटे, प्रा. सुशिला भोंग समवेत विद्यार्थींच्या उपस्थितीत साजरा केला.

यावेळी अध्यक्षीय मनोगतात डॉ. पोर्णिमा कदम यांनी कवियत्री संगीता झुंजिरके यांनी सादर केलेल्या आई, दुष्काळ, मराठीचा शृंगार, माझा मामा केला, हुंडा, वाद नसायला पाहिजे. या कविता सादर केल्या. भावी शिक्षिकांसमोर आज त्यांनी प्रचंड शब्दसंग्रहाच्या जोरावर हृदयाला साद घालणार्‍या कविता सादर केल्या. आई कवितेमध्ये ‘न शिकलेल्या आयांना, अडानी म्हणता कामा नये’. तिने शाळेत जावून कुठलीच परिक्षा दिली नाही. जीवनाच्या परिक्षेत यशस्वी झाली म्हणून माझी आई मला जगात उच्चशिक्षीत वाटते. या कवितेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. समाज प्रबोधन व मराठी भाषेचे महत्त्व त्यांनी विशद केले, ही बाब कौतुकास्पद वाटते. विद्यार्थ्यांनी देखील वाचन, चिंतनद्वारे मराठी भाषेचा शब्द संग्रह वाढवून भविष्यात शिक्षिका झाल्यानंतर आदर्श समाज घडविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन यावेळी केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी स्वाती बोचरे व तेजश्री कडू यांनी केले. प्रास्ताविक प्रा. गीता कांबळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख लिना चोपडे यांनी केले. विद्यार्थीनी साहित्यिक नाटीका सादरीकरण करून कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र याबद्दल सखोल माहिती दिली. आभार प्रदर्शन अश्विनी कल्याणकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख पल्लवी चव्हाण समवेत आदींनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!