ताज्या घडामोडी

सोमाटणे येथून चार किलो  गांजा सह एकास अटक…

शिरगांव पोलिसांची मोठी कारवाई..One arrested with 4 kg ganja from Somatne... Big action by Shirgaon police

सोमाटणे येथून चार किलो  गांजा सह एकास अटक…

One arrested with 4 kg ganja from Somatne… Big action by Shirgaon police

आवाज न्यूज  : मावळ प्रतिनिधी, १ मार्च.

शिरगांव पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ४ किलो   गांजा सह एकास अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई दि. २८ रोजी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास सोमाटणे गावठाण येथे पवना नदीच्या तळेगाव पंप हाऊस शेजारी केली आहे.

या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई सदानंद विजय रुद्राक्षे (वय ३० ) यांनी शिरगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार याप्रकरणी आरोपी १) प्रवीण रमेश शेडगे (वय ३०, रा. घर नं.११४/ए, सोमाटणे गावठाण, तळेगाव, ता. मावळ, जि. पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर आरोपी २) मराठे  या दोघांविरोधात एन. डी. पी. एस.कायदा कलम ८ (क), २० (ब)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास पवना नदीच्या बाजूला तळेगाव पंप हाऊस शेजारी सोमाटणे गावठाण तळेगाव दाभाडे ( ता. मावळ जि. पुणे) येथे ही कारवाई करण्यात आली. नमुद तारखेला सदर ठिकाणी आरोपी प्रविण रमेश शेडगे याच्या कडे एकुण १,००,७५०  रुपये किमतीचा ४ किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या विक्री करिता जवळ बाळगताना मिळुन आला.

तपासात आरोपी शेडगे याने सदर गांजा हा आरोपी क्रमांक २ मराठे याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक. येडे साहेब करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!