ताज्या घडामोडी

जेथे नाही सारासार– तेथे अवतरला अवघा अंधकार. डॉक्टर शाळीग्राम भंडारी..

जेथे नाही सारासार– तेथे अवतरला अवघा अंधकार! Where there is no Sarasar– there is only darkness!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर ६ मार्च..

जन्मताच प्रत्येकाला परमेश्वराने सतसत बुद्धीच वरदान प्रदान केलेल आहे. समर्थ रामदास स्वामी आपल्या दासबोधात असं म्हणतात की सावध साक्षेपी साधक आगम निगम शोधक ज्ञान-विज्ञान बोधक निश्चयात्मक याचाच अर्थ मित्रांनो माणसाच्या ठायी असणाऱ्या उत्तम गुणांच दर्शन आपल्याला होतं.

पुढे जाऊन स्वामी असं म्हणतात जेथे नाही सारासार तेथे अवघा अंधकार याचा अर्थ सारासार विचार करण्याची शक्ती जी आपल्याला संस्कारातून प्राप्त होत असते त्यासाठी स्वामी दृष्टांत देतात जसे मातीवर केलेल्या संस्कारातून सुंदर शेती तयार होते दगडावर कोरलेल्या संस्कारातून सुंदर मूर्ती जन्माला येते. तसे आणि तसेच माणसाच्या आयुष्याच्या बाबतीत होत असतं कारण त्याला जन्मताच जे लाभल आहे त्याला सुंदर करणे हे सर्वस्वी त्याच्याच हाती आहे, जसे मला उत्तम गाता येत नाही याची हळहळ करण्यापेक्षा मला जे काही येतं; त्याला गती देण याच्यातच त्याचं शहाणपण असतं.

जर त्याला उत्तम चित्र काढता येत असेल, एखादे शिल्प कोरता येत असेल, तर त्याचा आनंद त्याने घ्यावा कारण आनंद देणे आणि घेणे यातच खरे जगण्याचे गाणे सामावलेले असते. शेवटी मित्रहो आपल्या ठायी जी आहे, त्याचे योग्य नियोजन करणे याच्यातच जीवनाची सार्थकता दडलेली आहे मुळात जे आहे तेच अधिक सुंदर करणं हीच खरी शास्वत संस्कृती आहे. कारण जशी गव्हाची पोळी झाली तांदळाचा भात झाला तर त्याला अन्नाचा दर्जा प्राप्त होतो पण ! गहू तांदूळ दळला नाही शिजवला नाही तर त्याला कीड लागण्याची शक्यता जास्त असते. कारण निसर्गाचा नियम असाच आहे की कोणतीही मौल्यवान गोष्ट जर तशीच पडून राहिली असेल तर ती मानवजातीला नुकसानकारक ठरू शकते म्हणूनच मित्रांनो कुठलेही क्षेत्र असो त्यात जर मानवाला गती आणि प्रगती प्राप्त करायची असेल तर त्याने आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवूनच कृती केली पाहिजे.

 

लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!