ताज्या घडामोडी

भोई प्रतिष्ठानचा, तीन वर्षांपासून खंडित झालेला उत्साह,”रंग बरसे ” १०० पोती पर्यावरण पूरक नैसर्गिक रंग खेळत , साजरा.. 

पुण्याचे अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर ,अपर पोलीस आयुक्त. राजेंद्र डहाळे, नवनिर्वाचित आमदार. रवींद्र धंगेकर आदी मान्यवरांनी मुलांच्या या आनंदात सहभागी घेतल्याने मुलांचा उत्साह द्विगुणित..

भोई प्रतिष्ठानचा, तीन वर्षांपासून खंडित झालेला उत्साह,”रंग बरसे ” १०० पोती पर्यावरण पूरक नैसर्गिक रंग खेळत , साजरा.Bhoi Pratishthan’s three-year-long enthusiasm, “Rang Barse” celebrated with 100 bags of eco-friendly natural colors.. 

आवाज न्यूज : श्रेयस परदेशी, पुणे प्रतिनिधी.७ मार्च..

पुण्याचे अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर ,अपर पोलीस आयुक्त. राजेंद्र डहाळे, नवनिर्वाचित आमदार. रवींद्र धंगेकर आदी मान्यवरांनी मुलांच्या या आनंदात सहभागी घेतल्याने मुलांचा उत्साह द्विगुणित झाला.

 

तीन वर्षांपासून रोखून धरलेला उत्साह, १०० पोती पर्यावरण पूरक नैसर्गिक रंग ,पाण्याचे फवारे उडवून आनंद लुटणारे अग्निशमन दला चे जवान,विविध क्षेत्रातील मान्यवर आणि अंगा अंगावर होणारी रंगांसोबतच फुलांची उधळण अशा धुलीवंदनाच्या धुंद वातावरणात अमिताभ च्या जादुई आवाजात *रंग बरसे* गाणे सुरू झाले आणि सतराशे चिमुकल्यांनी मनसोक्त डान्स सुरू केला.

रंग बरसे भीगे चुनर वाली पासून सुरू झालेला प्रवास शांताबाई, खंडेरायाच्या लग्नाला, होलिया मे उडा रे गुलाल करीत करीत झिंग झिंग झिंगाट पर्यंत पोहोचला आणि १७०० विशेष मुलांनी खऱ्या अर्थाने धुलीवंदनाचा आनंद लुटला.

निमित्त होते पुण्यातील भोई प्रतिष्ठान तर्फे दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या *रंग बरसे* उपक्रमाचे. यंदा या कार्यक्रमाचे २७ वे वर्ष होते.

 

यामध्ये अनाथ मुले, एचआयव्ही पॉझिटिव्ह मुले रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणारे मुले,अंध व अपंग मुले ,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले ,देवदासी भगिनींची मुले ,मतिमंद मुले अशा विविध संस्थांचा सहभाग होता.
पुण्याचे अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर ,अपर पोलीस आयुक्त. राजेंद्र डहाळे, नवनिर्वाचित आमदार रवी धंगेकर आदी मान्यवरांनी मुलांच्या या आनंदात सहभागी घेतल्याने मुलांचा उत्साह आणखी वाढला.

कार्यक्रमाचे संयोजक ,भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी या वंचित मुलांच्या आयुष्यात आनंदाचे आणि उत्साहा चे रंग निर्माण करण्यासाठी गेली सत्तावीस वर्षे या उपक्रमाचे आयोजन करत करण्यात येत असल्याची माहिती दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!