ताज्या घडामोडी

या चिमण्यांनो परत फिरा……….

एमआयटी ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक चिमणी दिवस साजरा..

या चिमण्यांनो परत फिरा……….एमआयटी ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक चिमणी दिवस साजरा :Come back these sparrows……….World Sparrow Day Celebration at MIT Junior College.

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, वार्ताहर ११ मार्च.

वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे “चिऊताई” नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आणि याच गहन पर्यावरण समस्येवर एक उपाय म्हणून तळेगाव नगरपरिषद व अवीज फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून एमआयटी ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक चिमणी दिना निमित्त, ‘माझी वसुंधरा” या कार्यक्रमांतर्गत; पुठ्ठा वापरून चिमणी साठी घरटे करणे, ते स्थापित करणे व त्याची काळजी घेणे यासंबंधीची कार्यशाळा घेण्यात आली.

 

या कार्यशाळेत विद्यार्थी वर्गाने उत्साहात भाग घेत स्वतः घरटी बनवली, तसेच चिमणीचे जागतिक महत्त्व आणि तिचे संवर्धन करणे याबाबत माहिती घेतली. या कार्यशाळेत ९० विद्यार्थी सहभागी झाले आणि त्यांच्या मार्फत ४५ चिमणी घरटे तळेगाव व परिसरात स्थापन करण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!