ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे नगरपरिषदे मार्फत मियावाकी पद्धतिने श्रमदान करत ५३० वृक्षांची लागवड, माझी वसुंधरा अभियानांतर्गत राबविला उपक्रम…

तळेगाव दाभाडे नगरपरिषदे मार्फत मियावाकी पद्धतिने श्रमदान करत ५३० वृक्षांची लागवड, माझी वसुंधरा अभियानांतर्गत राबविला उपक्रम…Through Talegaon Dabhade Municipal Council, 530 trees were planted by donating labor through the Miyawaki method, an activity implemented under Majhi Vasundhara Abhiyan…

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १८ मार्च.

 

शनिवार दिनांक १८ मार्च २०२३ रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत भूमी या घटकाच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन तळे परिसरात पुणे-मुंबई हायवेलगत मियावाकी पद्धतिने श्रमदानातून वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला. हा वृक्ष लागवडीचा उपक्रम तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या श्रमदानातून पार पडला.

या उपक्रमा अंतर्गत वड, पिंपळ, ताम्हण, सोनचाफा, बकुळ, स्पॅथोडिया या प्रजातींच्या ५३० वृक्षांची लागवड करण्यात आली. उन्हाळ्याच्या दिवसात वृक्षांचे जतन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी प्रथम ठिबक सिंचन चे काम या वृक्षलागवड ठिकाणी करण्यात आले आहे. वृक्ष लागवड उपक्रमा दरम्यान शहरातील पर्यावरणासाठी सातत्याने काम करत असलेल्या नागरिकांच्या कार्याची दखल घेत नगर परिषदेमार्फत महेश महाजन, ओगले, अभय केवट, ऋषिकेश कुलकर्णी, मयुरेश राजगुरव यांना मानपत्र देऊन पर्यावरण दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.

 

या वृक्ष लागवड उपक्रमाचे नियोजन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांच्या संकल्पनेतून उद्यान निरीक्षक सिद्धेश्वर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. यावेळी तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी, नगरपरिषदेचे सर्व संवर्ग अधिकारी, नगरपरिषद कर्मचारी तसेच वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य निलेश गराडे, रौनक खरे उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!