ताज्या घडामोडी

वाढीव वीज दराविरोधात उद्योजकांचा २४ मार्च रोजी भव्य मोर्चा..

उद्योजकांचा भव्य मोर्चा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या नेतृत्वाखाली दि.24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महावितरण कार्यालय भोसरी एमआयडीसी पावर हाऊस या ठिकाणी करण्यात येणार. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर..

वाढीव वीज दराविरोधात उद्योजकांचा २४ रोजी भव्य मोर्चा.A grand march of entrepreneurs on 24th against the increase in electricity rates.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी २० मार्च.

 

 

प्रस्तावित वाढीव वीज दराविरोधात उद्योजकांचा भव्य मोर्चा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या नेतृत्वाखाली दि.२४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महावितरण कार्यालय भोसरी एमआयडीसी पावर हाऊस या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले.

महावितरण ने विज बिलात पहिल्या वर्षी एप्रिल २०२३ .३७% आणि पुढल्या वर्षी ४१ टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे पहिली वाढ एप्रिल २०२३ पासून सक्रिय होईल आणि उद्योजकांनी ती स्वीकारल्यास पुढील वाट पुढील एप्रिल पासून होईल परंतु याला सर्व उद्योजकांचा विरोध आहे या मोर्चामध्ये फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन. मेटल फिनिशर्स असोसिएशन ऑफ पुणे व इतरही औद्योगिक संघटना सहभागी होणार असून अशी माहिती अभय भोर यांनी दिली.

महाराष्ट्रात वीज दरवाढीमुळे उद्योजक हैराण झाले आहेत त्यात विजेचा लपंडावामुळे लाईट जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून आणि येत्या काळामध्ये प्रस्तावित वीज दरामध्ये दर वाढ होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत सध्याचा वीजदर सुद्धा राज्यात मोठ्या प्रमाणात असून त्याचा उत्पादनावर खूप मोठा परिणाम होत असल्याचे उद्योजकांचे मत आहे.

आणि जर अशीच दरवाढ राज्यात होत असेल तर राज्यातून कारखाने परराज्यात जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली असून सरकारने विजेची दरवाढ करू नये आणि आहे ते विजेचे दर कमी करावेत या मागणीसाठी महावितरण कार्यालयावर उद्योजक भव्य मोर्चा काढणार आहेत या मोर्चामध्ये सर्व उद्योजकांनी आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा समाविष्ट होण्याचे आवाहन फोरम ऑफ स्मॉलस्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!