ताज्या घडामोडी

अगस्त्या फाउंडेशन वाकोवाक्यम प्रश्न मंजुषा राज्यस्तरीय स्पर्धेत म्हाळसाकांत स्कुल आकुर्डी प्रथम…

आत्मविश्वास आणि जिद्द चिकाटी असेल तर तुम्ही उंच भरारी घेऊ शकता. गुळवे सर.

अगस्त्या फाउंडेशन वाकोवाक्यम प्रश्न मंजुषा राज्यस्तरीय स्पर्धेत म्हाळसाकांत स्कुल आकुर्डी प्रथम. Mhalsakant School Akurdi First in Agastya Foundation Walkovakyam Question Manjusha State Level Competition.

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, २१ मार्च.

 

ऑटो क्लस्टर पिंपरी मध्ये अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय विज्ञान प्रशमंजुषा स्पर्धा पार पडली. यामध्ये ८ जिल्यातील पुणे, सातारा, रायगड,मुंबई, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, रत्नागिरी या जिल्ह्यात निवड झालेल्या ८ शाळेतील विधार्थांनी सहभाग घेतला.

सदर स्पर्धेचे उदघाट्न. प्रवीण तुपे सर माजी अतिरिक्त आयुक्त तथा संस्थापक संचालक पिंपरी चिंचवड सायन्स पार्क,  गुळवे सर एओ नगर परिषद तळेगाव दाभाडे,  नंदकुमार कासार सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी नेहरू विज्ञान केंद्र मुंबई.तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क. सुनिल पोटे. सहाय्यक शिक्षणाधिकारी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क. तसेच अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन टीम चे मॅनेजर  प्रकाश हांडे सर, ज्योतीबा सूर्यवंशी सर, विक्रम अवघडे सर, सुधीर सावंत सर, वैशाली कानगुडे मॅडम, राजेंद्र आवटे, सुमित मुरूमकर, एकनाथ जाधव, पांडुरंग जाधव ईश्वरी मगर मॅडम, शुभांगी गोरे व त्याची सर्व टीम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

सूत्रसंचालन. सुधीर सावंत सर व आभार  प्रकाश हांडे सर यांनी केले.सदर या राज्यस्तरीय स्पर्धेत  म्हाळसाकांत स्कूल आकुर्डी या विद्यालयाचा प्रथम क्रमांक आला.त्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले  मुधाईदेवी विद्यामंदिर देऊर सातारा द्वितीय क्रमांक, पारितोषिक, प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.  उमाबाई स्राविका विद्यालय सोलापूर तृतीय क्रमांक यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले । मान्यवर मध्ये  कासारकर सर यांनी ध्येयआणि स्पर्धा परीक्षा भाग घेणे आणि जिकणे किती महत्त्वाचे आहे सांगितले.

गुळवे सर यांनी आत्मविश्वास आणि जिद्द चिकाटी असेल तर तुम्ही उंच भरारी घेऊ शकता सांगून सर्वांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!