ताज्या घडामोडी

उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते व संचालक यांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे

मावळ : येथील अंदरमावळातील जांभूळ येथे गेट जवळ रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना या खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत होता. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली होती. नागरिकांची गैरसोय लक्षात घेत संत तुकाराम सहकारी साखर कारखाना मा. संचालक अंकुश आंबेकर, मा. उपसरपंच गणेश बोऱ्हाडे, जांभूळचे उपसरपंच एकनाथ गाडे, वैभव नवघणे,अमित नवघणे, अमर बो-हाडे यांनी रस्त्यावरील खड्डे स्वतः बुजवले.

खडडेमय रस्तामुळे नागरिकांना पायी चालणे अवघड झाले होते.वाहन चालकांना वाहन चालविताना त्रास सहन करावा लागत होता. यामुळे हातात खोरे, घमेले घेऊन रस्त्यावर उतरत या सर्वानी रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमध्ये मातीची भर टाकली.तसेच या रस्त्याचे काम करणा-या ठेकेदाराकडे अंकुश आंबेकर यांनी फोनद्वारे रस्ता दुरुस्तीची मागणी केली. त्यावर रेल्वेच्या आडमुठेपणामुळे काम थांबले आहे, तरी मी दोन दिवसात रस्ता दुरुस्त करून देतो असे आश्वासन ठेकेदाराने दिले.

याबद्दल अंदर मावळातील नागरिक व ग्रामस्थ यांनी सर्वांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!