भारताच्या ७५ व्या स्वातंञ्यदिनानिमित्त लोणावळा शहर व ग्रामिण भागात ध्वजारोहन कार्यक्रम उत्साहात संपन्न
लोणावळा : भारताच्या ७५ व्या स्वातंञ्यदिनानिमित्त लोणावळा शहर व ग्रामिण भागात ध्वजारोहन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कुसगाव बुद्रूक ग्रामपंचायतीचे हद्दीत वळकाईवाडी येथील जिल्हापरिषद कुसगाव बुद्रूकच्या सरपंच अश्विनी ज्ञानेश्वर गुंड यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंटीँगचे पालन करीत ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी उपसरपंच सूरज केदारी ,माजी जिल्हापरिषद सदस्या गंगा गोविंद कोकरे , ग्रामपंचायतीचे सदस्य राजेश काटकर तसेच ग्रामपंचायतीच्या सदस्या उपस्थित होत्या.ओळकाईवाडी येथे शाळेत ध्वजवंदन प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सदस्या वर्षा मधूकर कडू , फसीन मज्जिद शेख , शैला मोरे , सुजाता ठुले, मंदाकिनी झगडे, सुनिता किसन गुंड पाटील,अनिता गुंड, आदी उपस्थित होते.
लोणावळा नगरपरिषदेच्या इमारतीवरील ध्वजारोहन लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांच्या हस्ते झाले.
यावेळी सुरेखाताई जाधव यांनी कोरोनाला दूर सारण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. स्वच्छ सर्वेक्षण मधे लागोपाठ तीन वर्षे देशपातळीवर नंबर मिळाला तो सर्वांनी परिश्रम घेतल्यामुळे ! यापुढेही असेच सहकार्य करावे ,असे अवाहन केले.
यावेळी उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल , मुख्याधिकारी सोमनाथ जाधव , विविध विषय समिती सभापती पूजा गायकवाड ,रचन सिनकर, मंदा सोनवणे,कल्पना आखाडे , आरोही तळेगावकर ,माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड ,नगरसेवक ललीत सिसोदिया , राजू बच्चे ,देविदास कडू, श्रीधर पुजारी आदी उपस्थित होते.