ताज्या घडामोडी

‘मदत नव्हे कर्तव्य’ या भावनेतून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्यावतीने पदक विजेत्या खेळाडूंना आर्थिक मदत

वडगाव : शहरातील युवक खेळाडूं  चिराग वाघवले, शुभम तोडकर, रुचिका ढोरे, हर्षदा गरुड, सिद्धांत बिंदे यांनी पतियाळा (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविल्याबद्दल सामाजिक बांधिलकी जपत मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून आज नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने शहरातील पाचही खेळाडूंना प्रत्येकी एकवीस हजार रूपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक अशी एकूण एक लाख पाच हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी ढोरे यांनी सर्व खेळाडूंचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे, कुटुंबियांचे मनापासून अभिनंदन  केले.त्यांचे हे यश खरोखरच कौतुकास्पद असून त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. यापुढेही सातत्यपूर्ण परिश्रम व जिद्दीने यशाची अनेक शिखरे सर करावीत अशा मनःपूर्वक सदिच्छा ढोरे यांनी दिल्या.यापुढेही या खेळाडूंना वेळोवेळी अर्थिक मदत केली जाईल असे आश्वासन ढोरे यांनी दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!