क्रीडाताज्या घडामोडी

देवचंद महाविद्यालयात छात्रसेना दिन उत्साहात संपन्न 

कार्यक्रमास ज्युनियर काॅलेज कुंभोजचे मुख्याध्यापक व माजी छात्रसैनीक श्री.सागर माने यांची उपस्थिती!

Kiran G Patil M.No.8884357516

छात्रसेना विभाग देवचंद महाविद्यालय व एम.डी.विद्यालय अर्जुननगर यांच्या संयुक्त विद्यमाने “छात्रसेना दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8.40 वाजता प्रमुख पाहुणे रयत गुरूकुल पब्लीक स्कूल व ज्युनियर काॅलेज कुंभोजचे मुख्याध्यापक व माजी छात्र सैनीक श्री.सागर माने यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर छात्रसेने मार्फत मानवंदना देण्यात आली.

त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात सार्जंट वैष्णवी चौगुले, ज्युनियर अंडर ऑफिसर आकांक्षा आरडे, कॅडेट प्रतीक इंदलकर, कॅडेट सरिता कोळी यांनी छात्रसेना दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुणे सागर माने यांचा डॉ.जी.डी.इंगळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यानी सांगीतले की छात्रसेना तरुणांची जगातील सर्वात मोठी संघटना आहे.राष्ट्र बांधणीमध्ये छात्र सेनेचे मोठे योगदान आहे.छात्र सेने मार्फत राष्ट्रीय एकात्मता, जाज्वल्य देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण रक्षण इत्यादीं सामाजिक जाणीवा तर शारीरिक तंदुरुस्ती,व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण विकास, साहसीक खेळ, संवाद कौशल्य अशा वैयक्तीक गुणांचा विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक व शिस्तबद्ध प्रयत्न करते.यामुळेच अनेक आपत्कालीन परिस्थितीत जसे की भूकंप, महापूर, ट्राफिक कंट्रोल, करोना या कालावधीत छात्र सैनिक मदतनीस म्हणून सतत अग्रेसर असतात. छात्रसेनेच्या प्रशिक्षणा मुळे भारतीय तरुणाई शिस्तप्रिय, जबाबदार, परोपकारी प्रवृती, व आत्मविश्वासपूर्ण आयुष्य जगण्यास सक्षम बनतात याचे उत्तम उदाहरण मी स्वतःच आहे. मी स्वतःच या महाविद्यालयाच्या छात्र सेनेत प्रशिक्षण घेतले आहे व आज मी जो काही तुमच्यासमोर उभा आहे ते केवळ आणी केवळ छात्रसेना व देवचंद महाविद्यालयातील संस्कारां मुळेच. कोडणी सारख्या छोट्याशा खेड्यातून येऊन आज मी मराठी, हिंदी व इंग्लिश इत्यादीं भाषेत सहज संवाद साधू शकतो. अनेक शॉर्टफिल्म लेखन, टी.व्ही.शो.,रेडिओ जाॅकी व वृत्तनिवेदक अशा अनेक पदावर काम केले आहे व आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेत “सर्वात तरुण मुख्याध्यापक “असा सन्मान मिळवला आहे.या सर्व यशामध्ये छात्रसेनेचा सिंहाचा वाटा आहे हे मी नम्रपणे नमूद करतो.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ.जी.डी. इंगळे  यानी शैक्षणिक विकासा बरोबरच छात्रसेने मार्फत मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून घेऊन आपला विकास साधून, आपल्या, देशाच्या व महाविद्यालयाच्या नाव लौकिकात भर घालावी.आपल्या महाविद्यालयातील छात्रसेना विभाग अतिशय कृतिशील व उपक्रमशील आहे असे सांगून विभागाचे कौतुक केले.यावेळी मोहनलाल दोशी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापक एस.एम.गोडबोले उपस्थित होत्या.

यावेळी प्रथम छात्रसेना विभाग प्रमुख मेजर डॉ.अशोक डोनर यानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,थर्ड ऑफिसर सागर मगदूम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला,थर्ड ऑफिसर शिवानंद चौगुले यानी आभार प्रदर्शन केले तर कॅडेट तनुजा पाटील व कॅडेट आदिती घस्ते यांनी सूत्रसंचालन केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अंडर ऑफिसर ओंकार खोत, ज्युनियर अंडर ऑफिसर प्रसाद मगदूम, सार्जंट वैष्णवी चौगुले, कार्पोरल मयुरी चौगुले यानी परीश्रम घेतले तर 56 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.कोल्हापूर चे कमांडिंग ऑफिसर कर्नल पुनीत गोगीआ, सुभेदार मेजर रवळू बोकडे, 3 महाराष्ट्र एअर स्क्वॅड्रन एन.सी.सी.पुणे चे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अभिजीत खेडकर,संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डाॅ.तृप्तीभाभी शाह,खजिनदार सुबोधभाई शाह यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!