ताज्या घडामोडी

सामाजिक कार्यकर्ता आकाश दळवीला उच्च न्यायालयाकडून अटकपुर्व अंतरिम जामिन मंजूर

राजकिय हस्तक्षेपामुळे बलात्काराचा दाखल झाला होता गुन्हा- अॅड अतुल पाटील

मुंबई : बार्शीतील तरुण सामाजिक कार्यकर्ते व खांडवी ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश दळवी यांच्या विरोधात राजकीय हेतू मनात ठेवून 376 चा गुन्हा दाखल केला होता. परंतु हा आरोप पुर्ण पणे खोटा असून राजकीय दबाव फिर्यादीवर टाकून ही फिर्याद दाखल करायला लावली आहे,असे आमचे स्पष्ट मत होते. या संदर्भातील अनेक युक्तिवाद व घडामोडी मा. उच्च न्यायालया समोर आम्ही मांडल्या. हे सर्व युक्तिवाद व घडामोडीचा विचार करता आकाश दळवी यांना न्यायालायने अंतरिम जामिन मंजुर केला असल्याचे दळवी यांचे वकील अॅड. अतुल पाटील यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी अॅड. प्रशांत एडके यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभल्याचेही सांगितले.

आकाश दळवी हे माहिती अधिकार कार्यकर्ते असून, खांडवी ग्रामपंचायतीचे सदस्य देखील आहेत. खांडवी ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार तसेच विवीध कार्यकारी सोसायटी मधील गलथन कारभार व भ्रष्टाचार या विरोधात ते सतत नागरी हित पाहून आंदोलन करत असतात. या सर्व गोष्टीचा राग मनात धरुन त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्याविरोधात खोटी फिर्याद दाखल करण्यास ऐकाला भाग पाडले होते. पण गुऩ्हा घडला नंतर फिर्याद द्यायला झालेला विलंब, तसेच ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी असा गुन्हा होणे अशक्यच आहे, घटना जानेवारी महिन्यात घडली असल्याचे फिर्यादीचे म्हणने होते परंतु फिर्याद ही जुन महिण्यात दाखल केली गेली. तसेच या आगोदर देखील पोलिसांनी संपुर्ण चौकशी अंती ही तक्रार बंद केली असताना केवळ 25 जुनला पुन्हा ग्रामपंचायत व सोसायटीच्या विरोधात धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला म्हणून पोलिस अधिक्षकाकडे तक्रारी अर्ज दिला होता. अशा अनेक बाबीचे मा.उच्च न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले. व यावर न्यायालयाने आमचे म्हणने एकून दळवी यांना अंतरिम जामीन मंजुर करण्यात आला. असल्याचे अॅड. अतुल पाटील यांनी सागितले.

सामान्यांच्या हक्कासाठी लढणे गुन्हा आहे का ?

खांडवी गावातील शेतकरी व सामान्य नागरीक अनेक परस्थितीशी झगडत आहे. शेतकरी वर्गाला अनेक आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. खांडवी सोसायटी मधील चाललेला मनमानी कारभार हा शेतकऱ्यांच्या प्रगतीला अडथळा निर्माण करत आहे. सोसायटीच्या मदतीचा लाभ हा प्रत्येक शेतकऱ्यांना झाला तर खांडवी मधील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन उंचावण्यास निश्चित मदत होणार आहे. माझा लढा हा खांडवी मधील त्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी, त्या प्रत्येक तरुणासाठी आहे ज्याच्या अधोगतीला गावातील भ्रष्ट घटक व राजकारणी कारणीभुत आहेत. पण गावातील काही राजकारणी घटक शेतकरी वर्गाच्या हिताच्या आड येत आहेत. माझा न्यायव्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे.असे खाडवी ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश दळवी यानी सांगीतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!