ताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसर

निपाणीत राष्ट्रीय मानवाधिकार संघटने कडून गोरगरिबांना साहित्याचे वाटप!

ख्रिसमस सणाचे औचित्य साधत शाळेतील विद्यार्थ्यांना देखील बक्षीस वाटप!

Kiran G.Patil M.No.8884357516


परवाच संपूर्ण देशात साजरा झालेल्या ख्रिसमस सणाचे औचित्य साधत नेहमीच गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणाऱ्या निपाणीतील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना व गरजू महिलांना अनेक वस्तूंचे वाटप करून एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने ख्रिसमस सण साजरा केला.

या सर्व कार्यक्रमाचे आयोजन पालक दादू साळुंखे यांनी केले होते. त्यावेळी श्री मेघनाथ पवार यांनी जीवनात शांती कशी मिळते याविषयी बायबल मधील काही वचने सांगून याचे आपल्या जीवनातील महत्त्व विशद केले. त्यावेळी लहान मुलांना बक्षीस वितरण देखील करण्यात आले. तसेच समाजातील गोरगरीब महिलांना साड्यांचे वितरण देखील करण्यात आले.

कार्यक्रमास माजी नगरसेवक नंदकुमार कांबळे, मानवाधिकार संघटनेच्या उपाध्यक्ष योगिता कांबळे श्री सतीश खोत, संघटनेच्या सेक्रेटरी  वैशाली खोत, कमल जगताप अर्चना जगताप द्रौपदी साळुंखे उदय हेगडे श्री वराळे संतोष हुद्दार, मुर्गेश खानापुरे, श्री वराळे,सुधीर भोसले यांच्यासह महिला विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!