ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे स्पर्धा परीक्षा संपन्न!

स्पर्धा परीक्षेत प्रथम आलेल्या धनश्री महादेव देवळे यांचा महाविद्यालया कडून सत्कार!

Kiran G.Patil M.No.8884357516


गुरुवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी देवचंद महाविद्यालय अर्जुन नगर येथे स्पर्धा परीक्षा केंद्र मार्फत इयत्ता अकरावी कला शाखेतील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा संपन्न झाली विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात येणाऱ्या स्पर्धांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी त्यांची पार्श्वभूमी तयार व्हावी व पाया मजबूत हवा या हेतूने सुरू केलेल्या या स्पर्धा परीक्षेच्या केंद्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

येथील सर्वच विषयाच्या प्राध्यापकांनी त्यांना उत्कृष्ट व दर्जेदार असे मार्गदर्शन केले त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याचे मत महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉ. जी डी इंगळे यांनी उद्गार काढले. स्पर्धा परीक्षेतील गुनानुक्रमे विद्यार्थी खालील प्रमाणे.

प्रथम – धनश्री महादेव देवळे

द्वितीय – संज्योती संदीप गुरव

तृतीय – रिया एकनाथ जाधव

उत्तेजनार्थ

रोहित संजय सावंत व

तनुजा अनिल निकम

या स्पर्धकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक या स्पर्धा परीक्षा विभागाचे सह-समन्वयक प्रा नवनाथ कुंभार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विजयकुमार पाटील यांनी केले . कार्यक्रमाचे आभार प्रा.प्रकाश पाटील यांनी मानले. यावेळी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्राध्यापकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अशोक पवार व शिक्षक प्रतिनिधी डॉ भरत पाटील, प्रा. योगेश पाटील, प्रा शिवाजी कुंभार प्रा.सदानंद झळके ,प्रा विनायक कुंभार, डॉ. राहुल घटेकरी, प्रा.तुकाराम पाटील, प्रा आशा साळुंखे , प्रा.वैशाली पाटील, प्रा दीपक पाटील, प्रा. एस.ए.चिवळकर उपस्थित होते .कला शाखेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!