आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्र

देवचंद महाविद्यालयात क्रिकेट स्पर्धाना उत्साहात सुरुवात!

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर विभागीय क्रिकेट (पुरुष) स्पर्धाना अतिशय उत्साहात सुरुवात झाली!

Kiran G.Patil M.No.8884357516


दिनांक 5 जानेवारी रोजी देवचंद महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर विभागीय क्रिकेट (पुरुष) स्पर्धाना अतिशय उत्साहात सुरुवात झाली. सदर स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्यातील 24 पुरुष संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे आयोजन देवचंद महाविद्यालय व तात्यासाहेब कोरे इंजि. कॉलेज वारणानगर अश्या दोन मैदानावर करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.जी.डी. इंगळे यांच्या हस्ते मैदान पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी कोल्हापूर झोनल स्पोर्ट्स कौसीलचे सचिव प्रा. सुहास वाघ, स्पर्धा प्रमुख प्रा. डॉ. रविंद्र चव्हाण, प्रा. अमीन बाणदार, प्रा. सणगर, प्रा. शिंदे तसेच स्पर्धेचे पंच श्री. सुनील खांडके, श्री. महेंद्र सूर्यवंशी व श्री. प्रतिक पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी प्राचार्यानी खेळाडूना मार्गदर्शन केले व स्पर्धेत खिलाडूवृतीने सहभागी होवून खेळाचा आनंद घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रविंद्र चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. निरंजन जाधव यांनी केले.

देवचंद कॉलेज येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विवेकानंद कॉलेज कोल्हापूर संघाने डॉ. ए.डी. शिंदे इंजि. कॉलेज भडगाव या संघाचा १६९ धावांनी पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. तर दुस-या सामन्यात वेंकटेश महाविद्यालय इचलकरंजीच्या संघाने डी.वाय. पाटील इंजि. कॉलेज साळोखेनगर संघाचा ३४ धावांनी पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला.

वारणानगर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात डी. वाय. पाटील इंजि. कॉलेज कसबा बावडा संघाने न्यू कॉलेज कोल्हापूर संघाचा १४५ धावांनी पराभव केला, तर दुस-या सामन्यात जयसिंगपुर कॉलेज जयसिंगपूरच्या संघाने जे. जे. मगदूम इंजि. कॉलेज जयसिंगपूर संघाचा ३५ धावांनी पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला.

स्पर्धा आयोजित करणेसाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार श्री. सुबोधभाई शाह यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. तसेच जिमखाना कर्मचारी श्री. संतोष वागळे व श्री. वैभव सोनार यांनी मेहनत घेतली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!