ताज्या घडामोडी

पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने पोलीस बांधवासाठी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

तळेगाव : पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य, मावळ विभाग यांच्यावतीने तसेच गजाननभाऊ चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाने तळेगाव दाभाडे मावळ येथील पोलीस स्टेशन मधील कार्यरत पोलीस अधिकारी यांच्यासाठी रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला.

आपण सर्व जण घरी बसून आपल्या कुटुंबाबरोबर सण उत्सव साजरे करत असतो पण आपले पोलिस बांधव मात्र जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत असतात, आपले सण उत्सव त्यांना साजरा करता येत नाही. त्यांना ही सण साजरे करता यावेत. तसेच त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्यातील पवित्र सण असोसिएशनच्या वतीने साजरा करण्यात आला.

यावेळी सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव , पोलीस निरीक्षक शहाजी पवार ,पोलीस नाईक वाबळे तसेच पोलीस फ्रेंड्स वेलफेअर महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिलनाना भोंगाडे, मावळ महिला अध्यक्षा रुपाली  दाभाडे, मावळ तालुका अध्यक्ष अतुल भेगडे, तळेगाव अध्यक्ष बजरंग रंधवे, लोणावळा शहर अध्यक्ष संजय मांढरे, देहूरोड शहर अध्यक्ष लक्ष्मण शेलार, कामशेत शहर अध्यक्ष चेतन वाघमारे, रामदास काकडे, सोमनाथ चोपडे, देहूरोड महिला अध्यक्षा हेमा रेड्डी, मावळ महिला उपाध्यक्ष सविता मंचरे, पवन मावळ महिला अध्यक्षा संगीता मुऱ्हे, विवेक हळदणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमचे प्रास्ताविक मावळ महिला अध्यक्ष रुपाली दाभाडे यांनी केले. नाईक पाटील यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच  गजाननभाऊ चिंचवडे यांनी असोसिएशनच्या वतीने पोलीस बांधवाना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन लक्षमण शेलार यांनी केले. तर आभार प्रदर्शन मावळ तालुका अध्यक्ष अतुल भेगडे यांनी केले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!