आपला जिल्हाताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

देवचंद महाविद्यालयात “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” उत्साहात!

मराठी भाषेतील निवडक वाचन साहित्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते!

Kiran G.Patil M.No.8884357516


येथील सुवर्ण ग्रंथालयात सोमवार दि.15 जानेवारी 2024 रोजी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा “ निमित्त मराठी भाषेतील निवडक वाचन साहित्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. मराठी भाषेतील निवडक वाचन साहित्य यामध्ये मराठी विश्वकोश, मान्यवर व्यक्तीचे चरित्र, आत्मचरित्र, मराठी साहित्य, शब्दकोश, ज्ञानकोश, गौरव ग्रंथ, व्यक्तीमत्व विकासासाठी आवश्यक पुस्तके, ऐतिहासिक पुस्तके, धार्मिक ग्रंथ, वाल्मिकी रामायण, महाभारत, श्री दत्तात्रेय ज्ञानकोश, मराठी नियतकालिके यांचा समावेश होता.या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो डॉ.जी डी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपप्राचार्य प्रो डॉ. पी पी शाह, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य अशोक पवार , पर्यवेक्षिका एस पी जाधव, डॉ अशोक डोनर आदी उपस्थित होते. सर्व प्राध्यापक वृंद आणि कार्यालयीन अधिक्षक दत्तात्रय पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना पुस्तक वाचण्यास प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तावित ग्रंथालय विभाग प्रमुख प्रभाकर पोळ यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्रीरंग जबडे यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भालचंद्र आजरेकर यांनी केले. याप्रसंगी ग्रंथालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!