क्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

अर्जुननगर परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ध्वजवंदन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्या हस्ते झाले!

Kiran G.Patil M.No.8884357516


येथील जनता शिक्षण मंडळ संचलित ; मोहनलाल दोशी विद्यालय , देवचंद कॉलेज ,किरणभाई शाह विद्यानिकेतन, मराठी कॉन्व्हेंट प्राथमिक विद्यालय ,आयटीआय, देवआशिष इंग्रजी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ध्वजवंदन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्या हस्ते झाले , ध्वजास एन.सी सी. व्हाईट आर्मी , स्काऊट गाईड च्या पथकांनी मानवंदना दिली व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सुजाता पाटील यांनी केले.

कार्यक्रमात एन सी सी कॅडेट कडून सेक्शन बॅटल ड्रील ( युद्ध कवायत) तसेच मिनी दिल्ली परेड सादर करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री प्रकाशभाई शाह, खजिनदार श्री सुबोधभाई शाह ,संचालक श्री प्रदीप मोकाशी ,श्री प्रदीप शाह, देवचंद कॉलेजच्या प्राचार्या डॉ.जी.डी.इंगळे,उपप्राचार्य श्री अशोक पवार,डॉ पी पी शाह,पर्यवेक्षक एस.पी.जाधव,एम डी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस एम गोडबोले,

किरणभाई शाह विद्यानिकेतन चे मुख्याध्यापक श्री एस टी यादव, आयटीआय चे प्राचार्य श्री एम पी भोसले, देवआशिष स्कूलच्या सौ ए एम भोसले कमांडिंग ऑफिसर कर्नल पुनीत गोगीआ,सुभेदार मेजर रवळू बोकडे, सुभेदार नायक, हवालदार संदीप गायकवाड, मेजर डॉ.अशोक डोनर,एन सी सी शिक्षक एस एम चौगुले, एस एस मगदूम, आदी उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!