Entertainmentताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्र

आविष्कार सांस्कृतिक अकादमीच्या वतीने निपाणीत शुक्रवारी गीत रामायण कार्यक्रम!

सायंकाळी 6 वाजता गांधी चौकातील व्यंकटेश मंदिरात आयोजन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी, ता. 20 : येथील आविष्कार सांस्कृतिक अकादमीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी (ता. 23) सायंकाळी 6 वाजता गांधी चौकातील व्यंकटेश मंदिरात मोफत गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून शहर परिसरातील रसिक श्रोत्यांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

महाकवी ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार गायक सुधीर फडके या प्रतिभावंताच्या अलौकिक प्रतीभेतून गीत रामायण कार्यक्रम अजरामर ठरला आहे. व्यंकटेश मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमास गायक आणि गायिका म्हणून अभिषेक पटवर्धन, प्रल्हाद जाधव, प्रसाद कुलकर्णी, डॉ. शीतल धर्माधिकारी, गौरी कुलकर्णी, गौतमी चिपळूणकर उपस्थित राहणार आहेत. त्यांना प्रशांत देसाई, संदेश खेडेकर यांची तबला साथ लाभणार आहे. अमित साळोखे, शिवाजी सुतार हार्मोनियम वादन करतील. केदार गुळवणी व्हायोलीन वादन, तर गुरू ढोले यांची रिदम साथ आहे. अधिक माहितीसाठी डॉ. संगीता देशपांडे, सुजय शहा, सुबोधभाई शाह, डॉ. सुहास शाह यांच्याशी संपर्क साधावा.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!