क्राईमताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

देवचंद कॉलेज अर्जुन नगर येथे “जागतिक महिला दिन” साजरा!

महिलांविरुद्ध सायबर गुन्हे" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले!

Kiran G Patil M No.8884357516


देवचंद कॉलेज अर्जुन नगर, येथे स्वयंसिध्दा सचेतना मंडळा मार्फत जागतिक महिला दिन साजरा,. 9 मार्च 2024 रोजी देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे “8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त” “महिलांविरुद्ध सायबर गुन्हे” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या व्याख्याना करिता प्रमुख मार्गदर्शक तज्ञ म्हणून प्रा. प्रशांत कुंभार , सहायक प्राध्यापक भूगोल विभाग,आणि बी.एस.सी. भाग-एक ची विद्यार्थिनी कु.अनुराधा बोरनाईक लाभले. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व महिला प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थिनीना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन झाली. याप्रसंगी *कु.अनुराधा बोरनाईक* यांनी त्यांच्या व्याख्यानात सायबर गुन्हे म्हणजे काय?,त्याचे स्वरूप सायबर गुन्ह्याचे प्रकार ,असे गुन्हे होऊ नये याकरता घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच *दुसरे तज्ञ मार्गदर्शक प्रा. प्रशांत कुंभार* यांनी त्यांच्या व्याख्यानातून आपण दैनंदिन सहजगत्या हाताळत असलेल्या अँड्रॉइड फोन ,व्हाट्सअप, स्नॅपचॅट, फेसबुक, ई-मेल, ई- ट्रांजेक्शन या व इतर गेम किंवा ॲपचा वापर करीत असताना अत्यंत काळजीपूर्वक त्याचा वापर केला पाहिजे, नाहीतर त्यामधून भविष्यात अनेक गंभीर सायबर गुन्हे घडतील. वरील सर्व ॲप वापरून झाल्यानंतर ताबडतोब मोबाईल डाटा बंद करणे किंवा साईन आऊट करणे महत्त्वाचे आहे  तसेच सायबर गुन्ह्याच्या प्रकारांचा उल्लेख केला त्यामध्ये महिलांना ब्ल्याक मिलिंग, महिला प्रतिमा मलिन करणे, सायबर स्टॉकिंग, कॅट फिशिंग, वेबकॅम हॅक करणे, फोटो मार्फिन, या प्रकारचे इतर सर्व अकाउंट यामध्ये ई-मेल अकाउंट, फेसबुक , व्हाट्सअप किंवा इतर अकाउंट हॅक केले जातात. त्यामुळे सर्व ॲपचा वापर करत असताना खूप दक्षतापूर्वक त्याचा वापर करण्यात यावा असे आव्हान  त्यांच्या व्याख्यानातून दिले. तसेच व्याख्यानाची सांगता करत असताना सायबर गुन्हे घडले असल्यास या गुन्ह्याची नोंद www.cybercrime.gov. in या वेबसाईटवर करण्यात यावी असा संदेश दिला.

कार्यक्रमाचे स्वागत-प्रास्ताविक डॉ. सुषमा जाधव- लिमकर यांनी केले. आभार डॉ. सुजाता पाटील यांनी मानले आणि सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया देसाई यांनी केले. या कार्यक्रमा करिता जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह आणि उपाध्यक्ष डॉ.सौ.तृप्तीभाभी शाह यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. जी. डी. इंगळे आणि उपप्राचार्य. प्रो.पी.पी.शाह यांचे मार्गदर्शन लाभले याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!