ताज्या घडामोडी

मावळात पर्यटन बंदी उठवावी – बजरंग दल

मावळ : मावळात पर्यटन बंदी उठवावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या माध्यमातून मावळचे तहसिलदार मधुसूदन बर्गे  यांना निवेदन देण्यात आलं.

तालुक्यात पर्यटनाला अनुकूल वातावरण असताना व राज्यातील निर्बंध शिथिल केले आहे तरी मावळ तालुक्यात पर्यटना बाबतचा निर्णय अजूनही शासनाने घेतलेला नाही त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या नागरिकांची उपासमार होत आहे अनेकांचा रोजगार बुडाला आहे त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

गेल्या दोन वर्षापासून  कोरोनामुळे पर्यटन संबंधित सगळ्या व्यवसाय बंद आहेत पण राज्यभरात इतर सगळ्या व्यवसायांना खुली सुट आहे पण मावळातील पर्यटन बंदी का असा सर्वसामान्यांकडून प्रश्न शासनाला विचारला जातोय. त्यामुळे मा. तहसीलदार यांना निवेदन देऊन मावळातील पर्यटन बंदी उठवून, पर्यटन व्यवसायावर अवलंबुन असनार्या सर्वसामान्यांना दिलासा द्यावा ही विनंती करण्यात आली.

यावेळी तालुका संयोजक प्रशांत ठाकर आणि गोपीचंद महाराज कचरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी संदेश भेगडे, बाळासाहेब खांडभोर, सुधीर दहिभाते ,चेतन ठाकर, मंगेश सुतार, अभिषेक बोडके ,श्रीरीष भालेकर, निलेश ठाकर, राजकुमार जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!