आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

सौ.भा.शाह कन्याशाळेत पालक मेळावा संपन्न!

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या संचालिका डॉ. प्रविणा शाह उपस्थित होत्या!

Kiran G Patil M.No.8884357516


दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचालित सौ.भागिरथीबाई शाह कन्याशाळेत इयता 10 वी विद्यार्थीनींच्या पालकांचा पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या संचालिका डॉ. प्रविणा शाह उपस्थित होत्या तसेच व्यासपीठावर शाळेच्या प्रभारी, मुख्याध्यापिका डॉ. सौ एस.जे पाटील, यु.बी. नागावे. एस एम चिकोडे आदी उपस्थित होते.

प्रारंभी शाळेच्या विद्यार्थीनीनी स्वागतगीत सादर केले. सौ. एस.जे.पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व प्रास्ताविकात शाळे मार्फत इयत्ता दहावी विद्यार्थीनीसाठी राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पालकांनी घरात मुलींना अभ्यासासाठी पूरक वातावरण निर्माण करावे. कोणतीही समस्या असल्यास शिक्षकांशी भेटून शंका निरसण करून घ्यावी असे सांगीतले. डॉ. प्रविणा शाह म्हणाल्या, “पालकांनी आपल्या पाल्याकडे वैयक्तिक लक्ष द्यावे. त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते निर्माण करावे. त्यांचा आत्मविश्वास वाढ‌विण्यासाठी मदत करावी. पालकमातांनी मुलींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. दिलेल्या वेळापत्रकानुसार  मुलींना घरी अभ्यास करण्यास प्रोत्साहीत करावे. मुलींनी अभ्यासासाठी मोबाईल व टी.व्ही, पाहणे टाळावे. यांची ध्यान, योगाची एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यानधारणेची सवय लावावी. दडपण न घेता स्वयंप्रेरणेने अभ्यास करण्यास प्रोत्साहीत करावे.

यु.बी. नागावे, एम.एम.चिकोडे यांनीही मनोगते व्यक्त केली. मुलीच्या गुणवत्ता वाढीसाठी होत असलेल्या विशेष प्रयत्ना बद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पालक माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या श्री सी.एम.बाडकर यांनी आभार मानले. पालक मेळावा यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष आशिषभाई शाह यांचे मोलाचे प्रोत्साहन मिळाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!