आपला जिल्हाकृषीक्राईमक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

कृषी पंपधारकांनी आधार लिंक करून घ्या – हेस्कॉम अभियंते अक्षय चौगुला

31 ऑगस्ट 2024 पर्यंत शेवटची मुदत! अतिरिक्त शुल्क देऊन बाहेरून काम करून घेऊ नका!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (23)

कर्नाटक सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेनुसार सर्व शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी जोडलेल्या कृषी पंप धारकांना नेहमीच मोफत वीज देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असते. त्यामुळे शेती वापरासाठी वीज जोडणी घेतलेल्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत निपाणी हेस्कॉम कार्यालयाशी संपर्क साधून आधार लिंक करून घ्यावे. विविध योजनां सह सवलतीच्या दरातील वीज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन हेस्कॉम तर्फे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

तालुक्यात एकूण  46 गावांमध्ये नदीकाठ, विहीर, कूपनलिका व अन्य ठिकाणी असे 13 हजार शेतकऱ्यांनी विद्युतपंप जोडणी घेतली आहे. 4600 पंपसेट धारकांनी आधार लिंक करून घेतली आहे. मात्र उर्वरित 8400 पंपसेट धारकांनी आधार लिंक केलेले नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना भविष्यात सवलतीची वीज व विविध सवलती देणे अडचणीचे ठरणार आहे.

पंपसेट शेतीची विक्री झाली असल्यास किंवा शेतमालक बदलला असल्यास अथवा मयत झाला असल्यास आर. आर. नंबर नमूद नसणे यासह अन्य बाबीची माहिती या आधार लिंकच्या माध्यमातून पंपसेट धारकाकडून घेतली जाणार आहे. यामध्ये संबंधित पंपधारकांकडून आगाऊ रक्कम न घेता केवळ नाममात्र नोंदणी शुल्क व दोन नमुन्यातील बाँड इतकी कागदपत्रे घेतली जाणार आहेत.

अधिक माहितीसाठी पंपसेट धारकांनी निपाणी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन हेस्कॉम अभियंते अक्षय चौगुला यांनी केले आहे.


बाहेरील लोकांना जास्तीचे पैसे देऊ नका..

एखाद्या शेतकऱ्याचा अपघातीने किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यामुळे त्याच्या नावे असलेले जुने पंपसेट आपल्या नावावर करण्यासाठी वरील कागदपत्रांचा पुरवठा केल्यास आपले पंपसेट कनेक्शन आपल्या नावावर केले जाईल. आणि यासाठी अतिरिक्त कोणते शुल्क आकारले जात नसून शासनाने आकारलेल्या रकमेतूनच सर्व काम होत आहे. त्यामुळे गाव पातळीवरील किंवा बाहेरील कोणाकडूनही हे काम न करून घेता आपण स्वतः जाऊन काम करून घेणे अतिशय स्वस्त व सुरक्षित असू शकते त्यामुळे बाहेरील लोकांना जास्तीचे पैसे देऊन काम करून घेऊ नका.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!