आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

अविष्कार सांस्कृतिक अकादमी निपाणी तर्फे डॉ.रघुनाथ कडाकणे यांचे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न!

औचित्य होते कवी कै. आर एन कुलकर्णी यांच्या "कस्तुरी" या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (24)

निपाणी येथील “आविष्कार सांस्कृतिक अकादमी” च्या रौप्यमहोत्सवानिमित्त आणि मराठी व संस्कृतचे विद्वान असलेले दिवंगत प्रा.डॉ. आर. एन. कुलकर्णी यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या “कस्तुरी” या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रा.डॉ. रघुनाथ कडाकणे, इंग्रजी विभाग प्रमुख राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर्. एन. कुलकर्णी यांचे बंधू जी. एन. कुलकर्णी , आविष्कारच्या अध्यक्षा डॉ.संगीता देशपांडे, सचिव डॉ.सुहास शहा, प्रा. नानासाहेब जामदार व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रारंभी नुकतेच निधन पावलेले ज्येष्ठ मराठी साहित्यिक महादेव मोरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. संगीता देशपांडे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.नानासाहेब जामदार यांनी केले. जी. एन. कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा.आनंद संकपाळ यांनी करून दिली. कार्यक्रमास निपाणीतील अनेक डॉक्टर्स, आय.एम.ए. व ब्राह्मकोष प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे माजी आमदार प्रा. सुभाष जोशी हे आवर्जून उपस्थित होते. तसेच निपाणीच्या सुकन्या आणि आजच्या आघाडीच्या ग्रामीण कथालेखिका सुचिता घोरपडे देखील उपस्थित होत्या. या निमित्ताने एक गोष्ट घडली. ज्यांच्या वर्गात बसून रघुनाथ कडाकणे यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी जीवनात कविता समजून घेतल्या त्याच शिक्षकाच्या अठ्ठेचाळीस कवितांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची संधी त्यांचे विद्यार्थी प्रा.डॉ. रघुनाथ कडाकणे यांना मिळाली. तीही अठ्ठेचाळिसाव्या वर्षीच ! हा एक प्रकारे काव्यात्म न्यायच म्हणायचा. या निमित्ताने “कविता एक अभिव्यक्ती” या विषयाच्या अनुषंगाने एकंदरीतच कवितेचा स्वभाव आणि तिचा माणसाच्या वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरील प्रभाव याबाबतीत डॉ. कडाकणे यांनी मुक्त चिंतन मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनीता देवर्षी यांनी केले तर आभार प्रा. अरुण हळदीकर यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!