आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

आंतरशालेय स्पर्धा परीक्षेत सुहानी युवराज चव्हाण प्रथम! 

श्री पार्श्वमती कन्या विद्यालय अकोळ येथे श्री संमतभद्र आंतरशालेय स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (24)

दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ भागीरथीबाई शाह कन्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी सुहानी युवराज चव्हाण हिने आंतरशालेय स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला. 

नुकत्याच श्री पार्श्वमती कन्या विद्यालय अकोळ येथे श्री संमतभद्र आंतरशालेय स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या. या स्पर्धा इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी होत्या व एन एम एम एस परीक्षेच्या आधारावर घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी या परीक्षा महत्त्वाच्या असतात या परीक्षेस अकोळ व निपाणी परिसरातील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. 

या विद्यार्थिनीने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्रीमान आशिषभाई शाह यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका डॉ. सौ एस जे पाटील व शिक्षकांचे मोलाचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!