आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

नगरपालिकेत अनैसर्गिक युती अस्तित्वात येणार का?

निपाणी नगराध्यक्ष निवडणूक भाजप,काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक ॲक्शन मोडमध्ये!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (26)

येत्या 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी निपाणी तालुक्यातील भाजप, काँग्रेस,राष्ट्रवादीचे नगरसेवक ॲक्शन मोड मध्ये आले असून सध्या निपाणी मध्ये परत एकदा निवडणूकमय वातावरण झाले आहे.

दरम्यान, निपाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीचे तेरा नगरसेवक सहलीवर गेले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देखील सहलीच्या योजनेची तयारीत असल्याचे समजते. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते पोहोचले देखील असतील.

31 नगरसेवकांच्या सभागृहात 30 नगरसेवक मतदानाचा हक्क बजावणार आहेत कारण एका नगरसेविकेचा मृत्यू झाल्यामुळे एक जागा रिक्त आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार एवढं नक्की..पण या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी नैसर्गिक युती झाल्यास नागरिकांना एक आश्वासक 14 महिन्याचा नगराध्यक्ष मिळू शकेल. आणि तसे न झाल्यास 14 महिन्याचा त्रांगडे नगराध्यक्ष पद घेऊन मिरवावे लागेल. कारण भारतीय जनता पार्टीचा एक नगरसेवक नाराज असल्याचे आपण मागील दोन वर्षापासून पाहतो. याची ठिणगी मध्यवर्ती शिवाजी चौकातील कार्यक्रमाने झाली होती. हे आपण सर्वजण जाणतोच. त्यातच दोन नगरसेविकेनी ऐनवेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी उत्तम पाटील गटात सामील झाल्यामुळे सध्या त्यांचे संख्याबळ फक्त तेरा वर समेटले आहे पण ते 13 जण सध्या सहलीचा आनंद घेत आहेत. सध्या जरी उत्तम पाटील गटाचे नगरसेवक सहलीच्या तयारीत असले तरी भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेविका धरून त्यांच्याकडे 12 जणांचे संख्याबळ आहे. म्हणजे 13+1+12 म्हणजे बरोबर 26 सभागृहाचे संख्याबळ  तर 30 नगरसेवकांचे, मग राहिलेले चार जण सध्या निपाणी मध्ये प्रत्यक्ष हजर राहून सहलीवर गेलेल्या व जात असलेल्या नगरसेवकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून निपाणीचा नूतन नगराध्यक्ष हा नैसर्गिक युतीतून होणार की निपाणी मतदारसंघात अनैसर्गिक युती महाराष्ट्रातील राजकारणाची री ओढणार ही येणारी 29 ऑगस्टची तारीख ठरवेल एवढं नक्की. 

दरम्यान, आपण मात्र निपाणी मतदारसंघातील चारही बाजूंनी अगोदरच आपल्या गाड्या घेऊन खड्डेयुक्त रस्त्यातून वाट काढत होणाऱ्या नैसर्गिक किंवा अनैसर्गिक युतीचा याची देही याची डोळा सोहळा पाहण्यासाठी नगरपालिकेच्या दारात स्वागतासाठी उभे राहून पुढील 14 महिन्याच्या नगरसेवकेस सदिच्छा द्यायच्या का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!