आपला जिल्हाकृषीक्राईमक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील पुतळा कोसळला!

8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केलं होतं अनावरण! सर्वत्र चर्चेचा विषय!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (27)

मागील आठ महिन्यांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौदल दिनाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवण येथे मोठ्या उत्साहात  उभारण्यात आला होता. तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा कोसळला आहे. पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप अस्पष्ट आहे.

नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण केलं होते. नौदल दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या कामाबद्दल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुरुवातीपासून चौकशीची मागणी केली होती. या झालेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!