आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

एकाच रात्रीत निपाणीत चार दुकाने फोडली!

दोनशे ग्रॅम चांदीसह 50 हजाराची रोकड लंपास, चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (2)

अगदी काहीच दिवसाचा सुटकेचा श्वास घेतल्यानंतर पोलीस प्रशासनासमोर परत एका चोरीच्या प्रकरणामुळे सणासुदीच्या दिवसात अगोदरच खडबडून जागे होण्यासाठी चोरट्याने एक प्रकारची सलामीच दिली आहे असे म्हटल्यास वावगे ठर नये. कारण निपाणी मध्ये दुकानातील पत्रा व सिलिंग कापून चोरट्याने केलेला प्रवेश, सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला असून त्या चोरट्याने एकाच रात्रीत चार दुकाने फोडली आहेत.

निपाणीत एकाच रात्रीत चार दुकानांत चोरट्यांनी चोरी करुन 200 ग्रॅम चांदीची नाणी व अंदाजे 50 हजाराची रोकड असा एकूण एक लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या घटनांची नोंद शहर व बसवेश्वर चौक पोलिसात झाली आहे. या घटनेतील संशयित सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे.

निपाणी नगरपालिकेच्या बाजूस जुना मोटर स्टॅड परिसरात अमृतराज पोळ यांच्या मालकीचे किराणा मालाचे दुकान आहे. शनिवारी मध्यरात्री चोरट्याने पोळ यांच्या दुकानाच्या छताचे काम सुरू असलेला पत्रा उचकटून आत प्रवेश केला. यावेळी संशयित चोरट्याने दोन कॅश ड्रॉवर मधील 200 ग्रॅम चांदीची नाणी व 15 हजार रुपये असा मुद्देमाल लांबवला. चिकोडी रोडला लागून असलेल्या तीन दुकानांतही चोरट्याने अशाच प्रकारे पत्रा उचकटून सिलिंग फरशी कट करून आतमध्ये प्रवेश केला. प्रवीण कुंभार (रा. चिखलव्हाळ) यांच्या इलेक्ट्रिकल दुकानात रोख रक्कम व इतर साहित्य शेजारीच असलेल्या गजानन पाटील (रा. निपाणी) यांच्या मालकीच्या मेडिकल मधून रोख रक्कम लांबविली. महेश कोळकी यांच्या मालकीच्या कापड दुकानातून पाच हजाराची रोकड लांबवली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!