ताज्या घडामोडी
भव्य लसीकरण अभियानाला लोणावळ्यातील नागरीकांचा उदंड प्रतिसाद
लोणावळा : पुणे जिल्हा परिषद व बजाज कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या बजाज कोविड 19 लसीकरण अभियानाला लोणावळेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.शहरात एकूण 6517 नागरिकांचे या मोहिमे अंतर्गत लसीकरण करण्यात आले. लोणावळ्यातील सर्व 14 केंद्राबाहेर नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत.
आज शहरात महालसीकरण अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आज सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत बजाज covid-19 लसीकरण सुरू राहणार आहे.
नागरिकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.