भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी राकेश ओसवाल तर सचिवपदी विनोद राठोड
दौंड : येथे भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी पुणे जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी मा.शिक्षण मंडळ सदस्य राकेश मोहनशेठ ओसवाल आणि जिल्हा सचिवपदी राठोड ज्वेलर्सचे मालक विनोद पूनमचंद राठोड यांची निवड करण्यात आली.
दौंड शहर येथे हॉटेल सिटी इन येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार व भीमा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष राहुल कुल,संघटन सरचिटणीस ॲड.धर्मेंद्र खांडरे,व्यापारी आघाडी प.महा.अध्यक्ष विकासदादा जगताप,व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष स्वप्निल शहा,सरचिटणीस सुदर्शनजी चौधरी,प.महा.उपाध्यक्ष मा.रोहिदास उंद्रे,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
यावेळी जिल्हा अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष गुलाबराव खांडेभराड,.पांडूरंग ठाकूर,देहूरोड शहर अध्यक्ष बाळासाहेब शेलार,तळेगाव शहर अध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,तळेगाव शहर व्यापारी अध्यक्ष निर्मलशेठ ओसवाल,कार्याध्यक्ष सागरशेठ शर्मा,मंडल अध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.