ताज्या घडामोडी

महाराजस्व अभियानाअंतर्गत मावळात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

मावळ : मावळ मतदार संघात गुरुवार (2 सप्टेंबर) पासून महाराजस्व अभियानाअंतर्गत व आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून मावळ विधानसभा मतदार संघात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुढील दोन महिने हा उपक्रम चालणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत शासकीय यंत्रणा मावळ मतदार संघातील प्रत्येक गावागावात जाऊन तेथील गरजू व पात्र नागरिकांना लाभ मिळवून देणार आहे. या अभियानाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!