ताज्या घडामोडी

पाटण रोड मळवलीजवळ अवैध दारूभट्टी पोलिसांकडून उध्वस्त ; १ लाख ८४ हजारांचा दारूसाठा व साहित्य जप्त करून केला नष्ट ..

लोणावळा : पाटण रोड मळवलीजवळ अवैध दारूभट्टी पोलिसांकडून उध्वस्त करण्यात आली. १ लाख ८४ हजारांचा दारूसाठा व साहित्य लोणावळा ग्रामिण पोलिसांकडून जप्त करून नष्ठ करण्यात आले.

आरोपी बिंदू करण राठोड (वय-३०, पाटणरोड ,मवळली ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

ता.२९ आॕगष्ट २०२१ रोजी सायंकाळी १९ वाजता लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक प्रविण मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पुष्पा एस.घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस फौजदार एस.एस.बनकर यांनी आरोपीवर भा.द.वि.कलम ३२८ व दारूबंदी आधिनियम कायदा ६५(ख) (ड) नुसार गुन्हा दाखल केला.

१ लाख ८४ हजार रूपयाचा २०० लिटरचे २३ बॕलर गावठी दारू व ४६ हजार लीटर आंबट उग्र वासाची गावठी हातभठ्ठीची दारू बनवायचे कच्चे रसायन पोलिसांनी बॕलर तोडून टाकत नष्ठ केले.

पुढील तपास फौजदार बनकर करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!