ताज्या घडामोडी

शिक्षकांची संकुचित विचारसरणी आदर्श समाज निर्मितीला मारक ठरेल – डॉ. मुरली बनावत

चिंचवड : शिक्षकांची संकुचित विचारसरणी आदर्श समाज निर्मितीला मारक ठरेल असे रसायनशास्त्र विभाग तज्ञ डॉ. मुरली बनावत यांनी तर शिस्त नसेल तर विद्यार्थ्यांचे जीवन अंधकार बनवू शकते, असे प्रतिपादन सचिव डॉ. दीपक शहा यांनी केले.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयात शिक्षक दिन काल साजरा करण्यात आला. त्यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा यांनी ऑनलाईन प्राध्यापकांबरोबर संपर्क साधून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्याध्यापिका सविता ट्रव्हीस आदींनी यात सहभाग घेतला.

कमला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बी.एड. विभागात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनीनी प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, प्रा. मनिषा पाटील, डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रा. सुनिल भोंग, डॉ. संतोष उमाटे, प्रा. अस्मिता यादव आदींच्या उपस्थितीत बी.एड.च्या विद्यार्थीनी वृषाली पोतदार, पल्लवी जाधव, गुलअफरोज शेख, सुप्रिया प्रभुणे, मनिषा कांबळे, बिंदू अंजिव, सुचिता उन्हाळे, सायली खरखडे यांनी केक कापूर शिक्षक दिन साजरा केला.त्यावेळी हैद्राबाद विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे तज्ञ डॉ. मुरली बनावत यांनी भावी काळात आपण शिक्षिका होणार आहात त्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

शिक्षिका विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, माझ्या मते जन्मदाती आई खरी शिक्षिका असते असे माझे मत असून शाळेतील शिक्षकांनी शिकणार्‍या विद्यार्थी मुलांवर चांगले संस्कारमय शिक्षण दिले तर, आदर्श समाज निर्मिती होवू शकेल. देश सुजलाम् सुफलाम बनेल. शिक्षकांनी समाज परिवर्तनाची कास अंगिकारावी. प्रत्येकात उपजात कलागुण असतात. त्यास उजाळा देणे हे शिक्षकांचे कर्तव्य असले पाहिजे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!