रक्तदान शिबिराला तळेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तळेगाव : कै. सतीश काका खळदे व कै. मुकुंद अण्णा पंढरीनाथ खळदे यांच्या स्मरणार्थ आणि पिंपरी सेरोलॉजीकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त तळेगावात रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.काकासाहेब खळदे नगर, मंत्रा सिटी, खळदे मळा येथे हा कार्यक्रम पार पडला यावेळी 65 बॅग रक्त संकलित झाल्याचे चंद्रकांत खळदे यांनी सांगितले.
रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे सुनिल शेळके यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी सुरेश खळदे, नितीन खळदे, महेश खळदे, संदीप खळदे, विशाल खळदे ,कुणाल खळदे, संकेत खळदे, अमर खळदे, ओंकार खळदे, विराज खळदे, गौरव खळदे, भावेश खळदे, सुनील खळदे, निकेत खळदे, श्रेयस शेडगे, सागर दिघे, नितीन फाकटकर, ब्रजेन्द्र किल्लेवाला, सिद्धार्थ किल्लेवाला, किरण गायकवाड, अशोक काळोखे, राजेंद्र लालगुडे, हेमलताताई खळदे, विशाल वाळुंज ,सुनील वाळुंज, राजेंद्र पोळ, नीलेश शिर्के, शिवाजीराव आगळे, संजय कसावी, अभिजीत चौधरी, सुमित चौधरी, रुपेश कदम, ईश्वर जगदाळे, शंतनू गायकवाड, योगेश गरुड, प्रकाश सुटाने, विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रभान खळदे यांनी आमदार आणि संयोजकांचे व रक्तदात्यांचे आभार मानले.