पुणे पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याची हात सफाई ; तब्बल दोन लाखांचे मोबाईल चोरले
पुणे : पालिकेतील आरोग्य विभागात काम करणारा कर्मचारी चक्क चोर निघाला आहे. या चोराने तब्बल 1 लाख 88 हजार रुपयांचे 21 मोबाईल चोरले आहेत. बिबवेवाडी पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतले आहे.
तानाजी रणदिवे (वय 33) रा. शांतीनगर रामटेकडी असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर असणारे कर्ज फेडण्यासाठी त्याने ह्या चोर्या केल्याची धक्कादायक कबुली आरोपीने दिली आहे.
पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर बिबेवाडी हद्दीत पेट्रोलिंग करत होते.अंमलदार सतीश मोरे यांना गंगाधाम रोडवर चोरीचे मोबाईल विकण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती मिळाली. या आधारावर सापळा रचून पोलिसांनी आरोपी तानाजी रणदिवे याला ताब्यात घेतले.
आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे सहा मोबाइल मिळाले.आरोपी पालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करत असून कर्ज फेडण्यासाठी बिबेवाडी, मार्केटयार्ड परिसरातून तब्बल 50 हून अधिक मोबाईल चोरून अनोळखी व्यक्तींना विकल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, राहुल शेलार यांनी केली.