नगरसेवक संतोषभाऊ भेगडे फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
तळेगाव गाव भागातून १६४८ गणेशमूर्तींचे संकलन व विधिवत विसर्जन
तळेगाव : नगरसेवक संतोषभाऊ भेगडे फाउंडेशनच्या वतीने तळेगाव गाव भागातून १६४८ गणेशमूर्तींचे संकलन करून विधिवत नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. यावर्षी सुद्धा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तळ्यावर किंवा नदीपात्रात विसर्जन करण्यास शासनाच्या वतीने बंदी घालण्यात आली होती. नागरिकांनी आपल्या घरच्या गणेश मूर्तीचे घरीच विसर्जन करावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले होते. तळेगाव शहरातील गणेश विसर्जन हे सातव्या दिवशी गुरुवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगरसेवक संतोषभाऊ भेगडे फाउंडेशनच्या वतीने तळेगाव गाव भागात “आपल्या लाडक्या बाप्पाचे मूर्ती संकलन व विधिवत विसर्जन” हा उपक्रम शासनाने दिलेल्या नियमांचे पालन व्हावे यासाठी घेण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी आपल्या घरच्या बापाला स्वयंसेवकांच्या हातात आणून द्यावा व निर्माल्य वेगळ्या पिशवीत द्यावे असे आवाहन नगरसेवक संतोष भेगडे यांनी नागरिकांना केले होते. या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नागरिकांच्या घराजवळ जाऊन स्वयंसेवक मूर्ती घेऊन ती वाहनात ठेवत होते. गणेश मुर्ती संकलनासाठी सुमारे २५ वाहने होती यासाठी ट्रॅक्टर, टेम्पो, व रिक्षा या वाहनांचा उपयोग करण्यात आला. यावेळी १६४८ श्रीगणेशमुर्तींचे संकलन केले व त्यांचे सर्व कार्यकर्त्यांच्या व स्वयंसेवकांच्या हस्ते विधीवत पूजा करून सर्व गणेशमूर्तींचे विधिवत नदीमध्ये विसर्जन करण्यात आले तसेच सर्व निर्माल्य एकत्र करून ते नैसर्गिक खत (कंपोस्ट खत) निर्मितीसाठी देण्यात आले.
गणेश मूर्ती संकलनासाठी घोरावाडी स्टेशन, अशोक विक्रम सोसायटी, शेलार चाळ, मरिमाता माळ, खळवाडी, रमाकांत नगर (बौद्ध वस्ती), भेगडे आळी पर्यंत, कैकाडी आळी, पणन मंडळ ते तळ्यापर्यंत, गणपती चौक, भेगडे आळी, कान्होबा मंदिर, शेतकरी मंडळ, कुंभारवाडा, चाफे मळा, डोळसनाथ मंदिरापर्यंत, चावडी चौक, राजवाडा ते डोळसनाथ मंदिरापर्यंत, बनेश्वर मंदिर, दाभाडे आळी, रिकामे मळा, सुभाष चौक, डोळसनाथ कॉलनी पर्यंत, लिटिल हार्टस सोसायटी, लक्ष्मीबाग कॉलनी, श्रीनगरी फेज १ व २, गणेश कॉलनी, ज्ञानेश्वर नगरीपर्यंत, गणपती चौक, बाजारपेठ, राजेंद्र चौक, तेली आळी ते मारुती मंदिर पर्यंत, राव कॉलनी, कडोलकर कॉलनी, संभाजी नगर, शांताई नगरी, शांताई सिटी सेंटर, नूतन शाळा, काळोखे वाडी, म्हस्कर्नेस कॉलनी दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत या भागातील नागरिकांच्या मूर्ती संकलन करण्यात आल्या.
यावेळी नगरसेवक संतोष भेगडे, हनुमंत भेगडे, दिनकर भेगडे, सचिन भेगडे, सोमनाथ भेगडे, शंकर भेगडे, शंकर वाजे, संतोष शेलार, पिराजी भेगडे, रुपेश गरुड, धनराज माने, निलेश निंबळे, आशुतोष भेगडे, अनिकेत वाघोले, सिद्धेश भेगडे, जीवन भेगडे, ऋषिकेश माने, शुभम भेगडे , ऋतिक टकले, अमित भसे मितुल भेगडे, अक्षय रानवडे, अनिकेत रानवडे, साहिल ईराणी, सिद्धेश घोडके, यश भेगडे, सचिन घोडके, अक्षय मुरकुटे, प्रणव भेगडे, अभय भेगडे व तरुण ऐक्य मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी मूर्ती संकलनासाठी व विसर्जन करण्यासाठी परिश्रम घेतले.