भजनसम्राट मावळभूषण ह.भ.प. नंदकुमार शेटे यांना आर्टबिटस् फौडेशनचा कलासन्मान जाहीर
लोणावळा : भजनसम्राट,मावळभूषण ह.भ.प. .नंदकुमार दत्तोबा शेटे महाराज यांना पुण्यातील आर्टबिटस् फौडेशन तर्फे भजन सिंगर हा कलासन्मान जाहीर झाला आहे.
भजन गायक ह.भ.प.शेटे महाराज यांनी साम टीव्ही , झी टाॕकीज , झीयुवा , शेमारू मराठी बाणा ,आदी टीव्ही वरील किर्तनात गायक म्हणून साथसंगत दिली आहे. त्यांनी भजनातून अनेक ठिकाणी भजनस्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांकाचे बक्षिस मिळवले आहे. उत्कृष्ट गायक म्हणूनही त्यांनी पुरस्कार मिळवले आहेत. तसेच त्यांच्या पत्नी सौ.आशाताई नंदकुमार शेटे यांनीही भजनस्पर्धेत उत्कृष्ट गायिका म्हणून अनेक ठिकाणी बक्षिसे मिळविली आहेत.
या संगीत क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत पुण्यातील आर्टबिटस् फौडेशन ने २०२१ मधील कलासन्मान भजनसम्राट नंदकुमार दत्तोबा शेटे यांना जाहीर केला आहे. त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातील मिञमंडळीकडून कौतुक होत आहे.