ताज्या घडामोडी

भाजपच्या वतीने कामशेत शहरात सेवा समर्पण सप्ताहाचे आयोजन 

 

कामशेत : येथे काल भारतीय जनता पार्टी कामशेत शहर वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सेवा समर्पण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्या अंतर्गत विविध कल्याणकारी योजना कार्यक्रम श्री गणेश मंगल कार्यालय येथे घेण्यात आला.

यामध्ये  असंघटित कामगारांसाठी सरकारी ‘श्रमिक कार्ड’ ही सर्वात मोठी योजना राबवण्यात आली. तसेच विविध योजनांची माहिती भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी दिली.

कोरोना साथीच्या काळात आशा सेविकांनी कामशेत शहरांमध्ये खूप मोठे योगदान दिले. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला.

तसेच भारतीय जनता पार्टी कामशेत शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष मोहन वाघमारे सूत्रसंचालन मा. उपसरपंच गणपत शिंदे आभार मीनाताई मावकर या कार्यक्रमाचे नियोजन शहराध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी केले.

या वेळी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे, उपसभापती दत्ता शेवाळे गुलाबकाका ,शांताराम कदम ,ज्येष्ठ नेते शंकरनाना शिंदे, ज्येष्ठ नेते सुकन बाफना,महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे, मा. सभापती सुवर्णा कुंभार, सरचिटणीस सुनील
चव्हाण, पु.जि.कुं. स. अध्यक्ष संतोष कुंभार,कार्याध्यक्ष अर्जुन पठारे, सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे, अध्यक्ष दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे, क्रिडा आ.अध्यक्ष नामदेव वारिंगे, धनगर प. अध्यक्ष नामदेव शेडगे, नाणे मावळ अध्यक्ष अमोल केदारी, कृती समिती अध्यक्ष सचिन येवले,वि. कार्याध्यक्ष प्रणव बोडके, हरिभाऊ दळवी, मा.सरपंच विजय शिंदे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गोरे,कार्याध्यक्ष सुमित्राताई जाधव,महीला आ. उपाध्यक्ष सारिका शिंदे, सोशल मीडिया प्रमुख ज्योतीताई काटकर,मा.सरपंच सारिका घोलप, कामशेत शहर महिला आघाडी ,मा.उपसरपंच नितीन गायखे, हरिभाऊ गायखे आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!