ताज्या घडामोडी
गुलाब चक्रीवादळ ; राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे त्याचे शनिवारी गुलाब चक्रीवादळाचे रूपांतर झाले. चक्रीवादळामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
रविवार संध्याकाळ पर्यंत हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील गोपालपुर आणि कलिंगपट्टम मध्ये पोचण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्र राज्यात जाणवेल. 26 ते 29 सप्टेंबर पर्यंत राज्यात मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.