ताज्या घडामोडी

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना स्वपक्षीयांचा घरचा आहेर

तळेगाव : येथील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी आयोजित केलेल्या 28 सप्टेंबर रोजी आयोजित सभेचा निषेध करणारे पत्र देत त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांना घरचा आहेर दिला आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची विशेष सभा 28 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेसाठी नगराध्यक्षांनी कोणालाही विश्वासात घेतले नाही. तसेच सभा बोलावणेबाबत व नगरसेवकांचे विषय विषयपत्रिकेमध्ये समाविष्ट करणेबाबत कोणतीही माहिती न देता सभा बोलवण्यात आली आहे असे पत्रात म्हटले आहे.

याबाबत भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे. नियोजित सभा रद्द करून नगरसेवकांचे प्रभागातील विविध विकास कामांचे विषय विषयपत्रिकांमध्ये समाविष्ट करून पुढील सभा बोलविण्यात यावी असे पत्रात नमूद केले आहे. या पत्रावर उपनगराध्यक्षांसह भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

यामुळे तळेगाव शहर भाजपमधील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर आली आहे.यापूर्वीही नगराध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस देत पत्रकार परिषदेपासून लांब ठेवण्यात आले होते. यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत राजकारण सुरू आहे का? अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!