ताज्या घडामोडी

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघातात एकाचा मृत्यू ; घाटात वाहतूककोंडी

खोपोली : पुणे – मुंबई महामार्गावर कंटेनरमधील कागदाचे मोठे रिळ कारवर पडून झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट जवळ एका ट्रेलर मधील कागदाचे मोठे रिळ कारवर पडल्याने कारचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात एक जण जागीच मृत्युमुखी पडला. कंटेनर मधील कागदाचे मोठे रीळ महामार्गावर पडल्याने घाटात वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलिस, बोरघाट पोलिस व आयआरबी यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही प्रमाणात वाहतूक सुरू करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!