मावळ तालुक्यातील साते गावात जनावरांचे लसीकरण मोहीम
साते : सभापती कृषी व पशुसंवर्धन बाबुराव आप्पा वायकर यांच्या सहकार्याने मावळ तालुक्यातील साते गावामध्ये जनावरांसाठी लंपी,घटसर्प व लाळ खुरकूत रोग नियंत्रण लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
या लसीकरण मोहिमेची सुरुवात गोमतेचे पूजन करून करण्यात आली.यावेळी बहुसंख्येने पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेतले.यावेळी पशुसंवर्धन विभाग जि. प. पुणे व पशुसंवर्धन विभाग मावळ पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांना आरोग्यासाठी उपयुक्त ठरणाच्या औषधांचे वाटप देखील करण्यात आले.
यावेळी सरपंच संतोष शिंदे,ग्रा.पं. सदस्य ऋषीनाथ आगळमे,गणेश बोऱ्हाडे,संदिप शिंदे ,आरती आगळमे, आम्रपाली मोरे,मीनाक्षी अगळमे,भाऊसाहेब अगळमे,एकनाथ येवले,प्रकाश अगळमे,मारुती अगळमे,मा.सरपंच विठ्ठल मोहिते,मा.उपसरपंच अनिल मोहिते,निखिल येवले,सिद्धार्थ मोरे,शंकर अगळमे,सुदाम अगळमे,सुरेश अगळमे,अर्जुन अगळमे,आशिष शिंदे,मुकुंद अगळमे,पशुसंवर्धन विभागाचे सर्व डॉक्टर व इतर ग्रामस्थ मंडळी व शेतकरी उपस्थित होते.