ताज्या घडामोडी

सिंहगडमध्ये विद्यार्थ्यांसाठी “पायथॉन प्रोग्रामिंग” या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

लोणावळा : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे एस. के.एन. एस.आय.टी.एस. , लोणावळा येथे संगणक अभियांत्रिकी विभाग यांच्या वतीने ” पायथॉन प्रोग्रामिंग” या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.

या कार्यशाळांमध्ये सुमारे २०० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला होता.या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना पायथॉन प्रोग्रामिंग बद्दल माहिती सांगण्यात आली. पायथॉन हे त्याच्या सामान्य उद्देश स्वरूपासाठी ओळखले जाते. ज्यामुळे ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या जवळजवळ प्रत्येक डोमेनमध्ये लागू होते . पायथॉन प्रोग्रामिंग चे वेगवेगळे टूल्स आणि त्याचे उपयोग तसेच हे इंस्टॉल कसे करायचे याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण या कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन देण्यात आले.

प्रशिक्षक म्हणून डॉ.गिरिजा चिद्दारवार यांनी कार्य केले. या कार्यशाळेचे आयोजन प्रा. स्वाती जोशी व डॉ.मनीषा ढगे यांनी केले होते या कार्य शाळेसाठी संगणक विभाग प्रमुख प्रा. गणेश कदम यांचे सहकार्य व प्राचार्य डॉ.एम.एस. गायकवाड,डॉ.मिलिंद रोहोकले यांचे मार्गदर्शन लाभले.हे ट्रेनिंग इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन ने पुरुस्कृत केले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!