ताज्या घडामोडी

सूर गंधर्व पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरेश साखवळकर यांचा सत्कार

तळेगाव : साप्ताहिक अंबरचे संपादक व उत्कृष्ट नाट्य संगीत गायक सुरेश साखवळकर यांना यंदाचा सुर गंधर्व पुरस्कार शंकराचार्यांच्या हस्ते मिळाल्याबद्दल त्यांचा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य व बांधकाम व्यवसाय चंद्रकांत भिडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

साखवळकर हे बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष आहेत.त्यांच्या संस्कृतचा गाढा अभ्यास आहे.त्यांची अनेक पुस्तके व  ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. ते एक उत्कृष्ट वक्ते असून गेली पन्नास वर्ष पत्रकारितेमध्ये आहेत.

या कार्यक्रम प्रसंगी सुरेश साखवळकर, सुरेश धोत्रे, विश्वास देशपांडे, विलास काळोखे, नितीन शहा, गोपाळ परदेशी, भरत छाजेड, राजू कडलक ,संजय चव्हाण सुरेश दाभाडे, नैना डोळस  चंद्रकांत भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!