ताज्या घडामोडी

लोणावळ्याच्या तुंगार्लीत पोहण्याचे तलावात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

वाढदिवसाचे दिवशीच दुर्दैवी घटना...

लोणावळ्याच्या तुंगार्लीत पोहण्याचे तलावात बुडून चिमुकल्याचा मृत्यू: वाढदिवसाच्या दिवशीच दुर्दैवी घटना.

आवाज न्यूज लोणावळा (प्रतिनिधी )मच्छिंद्र मांडेकर २१ जुलै,  लोणावळ्याच्या तुंगार्लीत पोहण्याचे तलावात बुडून चिमुकल्याचा मृत्यू: वाढदिवसाचे दिवशीच दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शिवबा आखिल पवार (वय-२ वर्षे , रा-सध्या शिक्रापूर , शिरूर , मूळ राहणार पाथर्डी , अहमदनगर ) असे मृत बालकाचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिस निरिक्षक सिताराम डुबल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस आधिकारी श्री मडके यांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीनंतर बालकाचे पार्थिव ता.१९ रोजी नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
या दुर्घटनेची फिर्याद बालकाचे वडील आखिल पवार , रा -शिक्रापूर ), यांनी दिल्यावरून लोणावळा शहर पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला.
घडलेली हकीगत अशी: आखिल पवार यांच्या जावळ्या – रावळ्या (जुळ्या ) दोन वर्षाच्या दोन्ही मुलांचा वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी त्यांनी कुटुंबातील व्यक्तींसह तुंगार्लीतील पुष्पा व्हीलायेथे हाॕल बुक केला होता. वाढदिवसाची तयारी हाॕलमधे करण्यात येत आसताना लहानगा शिवबा खेळता खेळता पोहण्याचे तलावात पडून बुडाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.
दरम्यान वाढदिवसाची तयारी झाल्यनंतर आई वडील नातेवाईक यांना शिवबा दिसला नाही. आई वडील व , नतेवाईक यांनी त्याचा सर्वञ शोध घेवूनही तो मिळाला नाही. अखेर त्यांना तो पोहण्याचे तलावात बुडालेला दिसला. त्याला तलावाचे बाहेर काढण्यात आला व रूग्णलयात नेण्यात आला ;माञ तो मृत्यूमुखी पडल्याचे डाॕक्टरांनी सांगितले .लोणावळा शहर पोलिस निरिक्षक सिताराम डुबल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी मडके पुढील तपास करीत आहेत.

जिल्हाधिकारी व पोलिसअधिक्षक यांनी दखल घ्यावी :
लोणावळा शहरात व ग्रामिण भागात अनेक बंगले आणि हाॕटेलमधे पोहण्याचे तलाव आहेत. या तलावात शेकडो पर्यटक , तरूण तरूणी मौजमजा , मस्ती , खेळ असे खेळतात.आंघोळ करतात.येथे सर्वच ठिकाणी लाईफ गार्ड असतातच आसे नाही. सुमारे ऐशी नव्वद टक्के पोहण्याचे तलावावर जीवरक्षक नसतात , त्यामुळे असे अनेक आपघाती मृत्यू हाॕटेलचे पोहण्याचे तलावात झालेले आहेत,या गोष्टी व दुर्घटना घडत असल्याने पालकांना आपली मुले , मुली यांचा आपघाती मृत्यू होत असल्याने त्यांचेवर दुःखाचा डोंगर कोसळतो .या घटनेची पोलिसअधिक्षक व जिल्हाधिकारी यांचेकडून दखल घेणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले . ..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!