ताज्या घडामोडी

रिक्षा चालक बांधवांसाठी किशोर आवारे यांची अनोखी दीपावली…

तळेगाव स्टेशन परिसरातील सर्व रिक्षा चालकांना आवारे यांनी ही अनोखी भेट दीपावलीच्या पूर्वसंध्येला दिल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे..

रिक्षा चालक बांधवांसाठी किशोर आवारे यांची अनोखी दीपावली…

आवाज न्यूज :  वार्ताहर, तळेगाव दाभाडे, २२ ऑक्टोबर.
सामाजिक : तळेगाव स्टेशन परिसरातील सर्व रिक्षा संघटना चालक ,मालक बांधवांना दीपावली निमित्त जनसेवा विकास समिती चे संस्थापक,अध्यक्ष किशोर आवारे यांच्या वतीने किराणा किट चे वाटप करून अनोख्या पद्धतीने दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

तळेगाव स्टेशन परिसरातील सर्व रिक्षा चालकांना आवारे यांनी ही अनोखी भेट दीपावलीच्या पूर्वसंध्येला दिल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .
तळेगाव स्टेशन परिसरातील सर्व रिक्षा संघटनांना किशोर आवारे यांच्या वतीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला जातो. तळेगाव स्टेशन परिसरातील
जनसेवा रिक्षा संघटना,
आदर्श रिक्षा संघटना,
तळेगाव चाकण रिक्षा संघटना,
यंशवत रिक्षा संघटना,
तळेगाव कातवी रिक्ष संघटना,
इंद्रायणी कालजे रिक्षा संघटना,
बालजी मार्बल रिक्षा संघटना,
तळेगाव वडगाव रिक्षा संघटना.
यांच्या सर्वच रिक्षा चालकांना ही भेट देण्यात आली.

“रिक्षा चालक बांधव हे समाजाचा कणा असून समाजाला उत्तम व प्रामाणिक सेवा देण्याचे काम ते करत असतात. मी रिक्षा चालकांना माझ्या कुटुंबातील एक सदस्य मानतो त्यामुळे दिवाळी ही नेहमीच तळेगाव शहरातील गोरगरीब कष्टकरी समाजाला सदैव सोबत घेऊनच जनसेवा विकास समिती साजरी करते” असे प्रतिपादन किशोर आवारे यांनी यावेळी केली आहे.

याप्रसंगी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे नगरसेवक निखिल भगत , सुशील सैंदाणे
रोहित लांघे, कल्पेश भगत , अनिल भांगरे, अनिल पवार, चंदन कारके , दीपक करके, सुनील पवार आदी जनसेवा विकास समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

“रिक्षचालकांच्या अडीअडचणी च्या काळात किशोर आवारे यांनी अनेक वेळा मोलाची मदत केली आहे.आमच्या अडचणीच्या प्रसंगी आवारे नेहमीच पाठीशी खंबीपणे उभे असतात. कोव्हिड काळातील त्यांचे कार्य लाख मोलाचे आहे. असे गौरवोद्गार आदर्श रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोळस यांनी काढले. या प्रसंगी दिलीप डोळस, नवनाथ चव्हाण, नितेश काटे, अनिल कुडाळकर, निलेश पारगे, राजेंद्र जाधव यांच्या सह सर्वच रिक्षा चालक उपस्थित होते.
नगरसेवक रोहित लांघे यांनी सर्वांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!