ताज्या घडामोडी

गुणवंत शिक्षक पुरस्कार स्नेहल बाळसराफ यांना प्रदान..

भोर येथे आमदार संग्राम थोपटे, वसंतराव ताकवले यांचे उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला.

गुणवंत शिक्षक पुरस्कार स्नेहल बाळसराफ यांना प्रदान

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी,२२ ऑक्टोबर.

 

पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहल बाळसराफ यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

भोर येथे आमदार संग्राम थोपटे, वसंतराव ताकवले यांचे उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला. स्नेहल बाळसराफ यांनी शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आग्रही भूमिका घेतली होती.

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या कार्यशाळा, विज्ञान प्रदर्शने, शिक्षक प्रबोधनवर्ग आदी माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन केले. याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!