ताज्या घडामोडी

स्व. केशवराव वाडेकर साहेब चिल्ड्रन पार्कचे उदघाटन संपन्न

कामशेत : स्व.उषाताई अरविंद पिंगळे यांच्या स्मरणार्थ वडगांव शहर भाजपाचे कार्याध्यक्ष आणि वडगांव नगरपंचायत चे विद्यमान नगरसेवक प्रसाद अरविंद पिंगळे यांच्या वतीने आणि वडगांव शहर भाजपा यांच्या संकल्पनेतुन जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी येथील मुलांना खेळण्यासाठी तयार केलेल्या स्व.केशवराव वाडेकर साहेब चिल्ड्रन पार्क चे उदघाटन मा.राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे , महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्या शुभ हस्ते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे , महिला मोर्चा अध्यक्ष सायलीताई बोत्रे, वडगांव शहर भाजपा अध्यक्ष किरण भिलारे, मावळ पंचायत समितीचे प्रभारी सभापती दत्तात्रय शेवाळे, मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर , एकनाथ टिळे ,सौ.सुवर्णाताई कुंभार, मा.उपसभापती शांताराम कदम , मा.जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण , नितिन घोटकुले, जितेंद्र बोत्रे, पंचायत समिती सदस्य सौ.ज्योतीताई शिंदे , श्रीमती पुष्पाताई वाडेकर ,महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला उपाध्यक्ष ज्योतीताई जाधव , गणेश धानिवले ,संस्कार चव्हाण उपस्थित होते.

आपल्या मनोगतात मा.राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत असे उपक्रम यापुढेही होतील अशी आशा व्यक्त केली.महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांनी आपल्या मनोगतात मावळ तालुक्यातील भाजपाच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देत या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी स्व.केशवराव वाडेकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याची माहिती दिली आणि असे उपक्रम यापुढेही होतील अशी ग्वाही दिली.

स्वागत शहराध्यक्ष किरण भिलारे यांनी केले , प्रास्ताविक नगरसेवक प्रसाद पिंगळे यांनी केले ज्यात त्यांनी या प्रकल्पाची संकल्पना विशद केली.सूत्रसंचालन मावळ भाजपा प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे आणि वडगांव शहर भाजपा सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर यांनी केले.आभार प्रदर्शन महिला मोर्चा अध्यक्ष सौ.धनश्रीताई भोंडवे यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!